मुख्य सामग्रीवर वगळा

ध्यान आणि ध्यानाची पूर्वतयारी

तुम्ही जर ध्यान कसे करावे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात. आपण आजच्या पोस्ट मध्ये ध्यान किंवा meditation याच विषयावर चर्चा करणार आहेत.
ध्यान धारणेची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे, आपल्याला अनेक ध्यानी ऋषी मुनींचे वर्णन आपल्या रामायण, महाभारत व ईतर साहित्यात मिळते.

योग आणि ध्यान वेगवेगळे आहेत का?
पतंजली योग सुत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आपल्याला मिळते. अष्टांग म्हणजे आठ अंग किंवा आठ भाग ते पुढिल प्रमाणे :- यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. याचाच अर्थ असा की योग ह्या प्रक्रिया मधल्या ध्यान हा एक भाग आहे. 
आज आपण प्रामुख्याने धारणा आणि ध्यान यावर चर्चा करणार आहे.

धारणा म्हणजे काय? 
जसे मी माझ्या मागील ध्यानाचे फायदे या ब्लाॅगमध्ये बोललो होतो एखादी गोष्टं किंवा घटना आपण आपल्या मनात किती वेळ धरून ठेऊ शकतो ही क्षमता म्हणजे आपली धारणाशक्ती.

पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एक उदाहरण घेऊन आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी समजुन घेता येईल. समजा तुम्ही एखाद्या देवाच्या प्रतिमेचे ध्यान करत आहात तर डोळे मिटून तुम्ही त्या प्रतिमेची स्पष्ट कल्पना तुमच्या मनात स्थिर ठेवता ही झाली तुमची धारणा, जेव्हा तुमच्या मनात त्या प्रतिमा सोडून दुसरा कोणताही विचार राहत नाही ती अवस्था म्हणजे ध्यान आणि ज्यावेळी मनात कोणत्याही प्रकारचा विचार राहत नाही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा सुध्दा नाही आणि
तुमची तीच अवस्था जवळपास अर्धतास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टिकून राहील त्यावेळी ती अवस्था म्हणजे समाधि.


तस सांगायचे झाले तर ध्यान करण्याचे खुप सारे प्रकार आहेत ज्यांच्यापैकी काहींच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत आणि ध्यान काय आहे कींवा कसे करायचे याबद्दल प्रसिद्ध असलेल्या गोष्टीसुद्धा मी सांगणार आहे येणाऱ्या काही ब्लॉगवर, पण त्याआधी या पोस्ट मधे मला काही गोष्टी सांगणे आवश्यक वाटते.

ज्यावेळी तुम्ही ध्यान करायला सुरू कराल त्यावेळी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी कीमान 1 ते 2 महीने तरी रोज ध्यान करण्यासाठी वेळ द्या

कोणत्या पध्दतीचा वापर करून कायम ध्यान करायचे हे ठरवण्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारांचा सराव करून पहा अर्थात मी रोज वेगवेगळ्या पध्दतीने ध्यान करा असे सांगत नाहिये पण एखादा प्रकार पक्का करण्याआधी एक एक आठवड्यासाठी एक एक ध्यानाच्या प्रकाराचा वापर करून तुम्हाला योग्य आणि सोईस्कर वाटेल तो प्रकार निश्चित करा.

अस होऊ शकते की जेव्हा तुम्ही नवीन नवीन ध्यान करायला चालु कराल त्यावेळी तुमच्या भावना कींवा तुमचे विचार, आठवणी वगैरे अधिक वाढल्या सारखे वाटतील त्यावेळी त्या भावनांशी कींवा विचाराशी प्रतिक्रिया व्यक्त करू नका अस होणे स्वाभाविक आहे, हे एक चिन्ह आहे की तुम्ही तुमच्या मनात चाललेल्या गतिविधि बद्दल जागृक होत आहात जे खुप चांगले आहे.

जर तुमच्या भरपूर सवयी बदलायच्या असतील तर सगळ्या सवयीवर एकाच वेळी काम करायला चालु करू नका कारण काही दिवसांनी तुम्ही तो बदल करणे थांबवुन पुन्हा पहिल्या ठिकाणी येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्याऐवजी एकावेळी एक सवय घेऊन त्यावर किमान एक ते दीड महिना फक्त त्या एकाच सवयीवर लक्ष केंद्रित करा आणि मग एक दीड महिना झाल्यावर या सवयीवर काम चालू ठेऊन दुसर्‍या सवयीवर काम करायला चालु करा. कारण तुमची पहिल्या सवयीचा सराव गेल्या काही महिन्यांपासून करत आहात त्यामुळे आता त्यासाठी तुमचे मन प्रतिरोध कमी करेल ज्याचा फायदा तुम्ही आणखी एक नवीन सवयीची सुरवात करून घेऊ शकता.

ध्यान करण्याला धार्मिक भावनेशी जोडणे गरजेचे नाहीये, ध्यान हे मनाची एकाग्रता, शांतता मिळवण्यासाठी करणे जास्त योग्य राहील असे मला वाटते. 

असे नाहिये की तुम्ही ध्यान करायला बसले की लगेच तुमचे एकाग्र होईल. कित्येकदा तर ध्यान करण्याची ईच्छा देखील होणार नाही पण अशावेळी आपण सातत्य राखायचे. मन एकाग्र झाले तर उत्तमच आहे आणि नाही झाले तरी प्रयत्न करत रहायचे, ज्यावेळी आपण आपल्या विचलित मनाला सारख सारख एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपल्या मनाचा व्यायाम आणि सराव होत असतो. 

शेवटी इतकेच म्हणेन की ध्यान ही एक कला आहे ज्याचा आपण जितका जास्तकाळ सराव करू तितके आपण त्यात पारंगत होतो. फक्त माहिती गोळा करून काही होणार नाही आपल्याला ध्यानाचे फायदे मिळवायचे असतील तर आपल्याला ध्यान करण्यासाठी रोज थोडा वेळ काढून ध्यानाचा सराव करावा लागेल. 

ध्यानाचे फायदे काय काय आहेत हे जाणून घ्या 

आगामी पोस्ट्स मध्ये आपण ध्यानाचे प्रकार जाणुन घ्यायला चालू करूयात. 

टिप्पण्या